Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याअरुणाचलमध्ये चीनची कुरापती

अरुणाचलमध्ये चीनची कुरापती

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

गलवान खोर्‍यात झालेल्या भारत-चीन सैन्याच्या झटापटीच्या ( India-China military clash )घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये पुन्हा एकदा भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले आहेत. यामध्ये 30 जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

लष्कराच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, 9 डिसेंबर 2022 रोजी तवांग सेक्टरमध्ये एलएसीजवळ पीएलए सैनिकांशी चकमक झाली होती. आपले सैनिक धैर्याने लढले. समोरासमोर झालेल्या या लढतीत दोन्ही बाजूंच्या काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. यानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्याने तातडीने संबंधित भागातून माघार घेतली. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले आहे.

दरम्यान, सन 1962 मध्ये भारत-चीन युद्धानंतर तब्बल 45 वर्षांनंतर 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोर्‍यामध्ये पुन्हा एकाद भारत-चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते.त्यांच्यामध्ये शस्त्रांचा वापर झाला नसला तरी लोखंडी काट्याच्या तारांसह त्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला होता. यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते तर त्यापेक्षा अधिक चीनचे सैनिक ठार झाले होते. यामुळे भारत-चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध अत्यंत तणावाचे बनले होते.

गलवानच्या घटनेचे भारतात मोठे पडसाद उमटले होते. भारतीयांनी चीनी वस्तूंच्या वापरावर बंदी घातली होती. तसेच केंद्र सरकारनेही याबाबत मोठं पाऊल उचलत चीनी वस्तूंच्या आयातीवर तसेच चीनी मोबाईल्स आणि अ‍ॅप्सवर बंदी आणली होती.

सरकारने गुळगुळीत भूमिका सोडावी : काँग्रेस

अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिक एकमेकांना भिढल्याची माहिती समोर येत आहे. आता वेळ आली आहे की सरकारने आता गुळगुळीत भूमिका सोडून चीनला कठोर शब्दात सांगावे की त्यांची अशी वर्तवणूक सहन केली जाणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या