Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशभारत-चीनकडून १०० ते २०० गोळ्यांचे फायरिंग

भारत-चीनकडून १०० ते २०० गोळ्यांचे फायरिंग

नवी दिल्ली:

भारत-चीन दरम्यान सीमेवर एप्रिलपासून तणाव सुरु आहे. India-China Border Tension सप्टेंबरच्या सुरुवातीला दोन्ही देशांनी चेतावनासाठी १०० ते २०० गोळ्यांचे राऊंड फायरिंग केल्या.

- Advertisement -

यापुर्वी ऑगस्ट महिन्यात चीनची पीपुल्स लिबरेशा आर्मी (पीएलए) भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा भारतीय सैन्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा चीनच्या सैनिकांनी गोळीबार केला. त्यानंतरही भारतीय सैनिकानी प्रत्युत्तर दिले. या घटनेनंतर आता पुन्हा सप्टेंबरच्या सुरुवातीला पैंगॉन्ग झील (Pangong Lake) च्या उत्तरी भागात भारत व चीन दरम्यान वॉर्निंग शॉट्स फायर (India, China fired warning shots) झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय सैनिक चीनी सैनिकावर लक्ष ठेवण्यासाठी पोस्ट तयार करत असतानी ही घटना घ़डली. चेतावनीसाठी १०० ते २०० गोळ्या हवेत फायरिंग करण्यात आल्या. भारताचे फिंगर ३ व ४ वर नियंत्रण आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचे जवळपास 50 हजार सैनिक पूर्व लडाखजवळ असलेल्या एलएसीवर तैनात आहेत. भारतानेही मिरर-डिप्लोयमेंट करत, चीनच्या बरोबरीने सैन्य एलएसीवर तैनात केले आहे. दरम्यान, दोन देशांमध्ये पार पडलेल्या ब्रिगेडियर स्तराच्या बैठकीत काहीही तोडगा न निघाल्यामुळे येत्या काही दिवसांत कोअर कमांडर स्तराची बैठक बोलावण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या