Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशभारत-चीन दरम्यान पाच मुद्यांवर सहमती

भारत-चीन दरम्यान पाच मुद्यांवर सहमती

मास्को

भारत आणि चीन दरम्यान सुरु असलेल्या तणावाचा पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेत LAC वरील तणाव कमी करण्यासाठी पाच मुद्द्यांवर सहमती झाली.

- Advertisement -

भारत आणि चीनदरम्यान LACवर संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियातील मॉस्कोत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्याच्या मुद्दयावर सहमत झाले. त्यासाठी एका पंचसूत्रीवर सहमती झाली आहे.

मॉस्कोमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे की, भारत LACवर सुरु असलेला तणाव वाढवू इच्छित नाही. परंतु चीनकडून सुरु असलेल्या हालचाली व्दिपक्षीय समझोताचे उल्लंघन करणारे आहे.

कोणत्या मुद्द्यांवर सहमती

-दोन्ही देशांचं सैन्य विवादित क्षेत्रातू वापस घ्यावं

-आपापसातील मतभेदांचे वादात रुपांतर होऊ देणार नाही

-निश्चित धोरणानुसार दोन्ही देशांमधील चर्चा सुरु ठेवावी

-सध्याच्या संधी आणि प्रोटोकॉल्स दोन्ही देश मानणार

-तणाव वाढेल असे कोणतेही पाऊल दोन्ही देश उचलणार नाही

दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या