Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याभारत- बांग्लादेश दुसरी कसोटी आजपासून

भारत- बांग्लादेश दुसरी कसोटी आजपासून

ढाका | Dhaka

भारत (india), बांग्लादेश (Bangladesh) संघांमध्ये सध्या २ कसोटी सामन्यांच्या कसोटी (Test) मालिकेचा थरार सुरु आहे. पहिल्या सामन्यात १८८ धावांनी यजमान बांग्लादेश संघावर दणदणीत विजय संपादन करून भारतीय संघाने मालिकेत १-० अशी विजयी आघाडी संपादन केली आहे.

- Advertisement -

आता भारत (india) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघांमधील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना गुरुवार २२ डिसेंबर पासून मीरपूर (Mirpur) येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात विजय संपादन करून कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अद्याप अंगठ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्यामुळे भारतीय संघाचं कर्णधारपद लोकेश राहुलकडे कायम असणार आहे.

कर्णधार म्हणून आपली पहिली कसोटी मालिका जिंकण्यासाठी लोकेश राहुल अँड कंपनी नवीन डावपेचांसह मैदानात उतरणार आहे. सामन्याला सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सीक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे. भारतीय संघाला बांगलादेश दौरा आटोपून मायदेशात श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळायची आहे.

त्यादृष्टीने भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. चितगांव येथील सलामी कसोटीत भारतीय संघाने विजय संपादन केला आहे. हा भारतीय कसोटी संघाचा बांग्लादेशविरुद्ध दहावा कसोटी विजय ठरला आहे. सलामी कसोटीतील पराभवातून सावरून नव्या उमेदीने मैदानात उतरून मालिकेत बरोबरी साधण्याचा बांग्लादेश संघाचा इरादा असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या