‘जी-7’ राष्ट्रांपेक्षा भारत लसीकरणात पुढे

ऑगस्टमध्ये 180 दशलक्षांहून अधिक लस मात्रा
‘जी-7’ राष्ट्रांपेक्षा भारत लसीकरणात पुढे

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

जी-7 राष्ट्रांच्या (G-7 nations ) एकूण लसीकरणापेक्षाही जास्त लसीकरण भारतात ( Corona Vaccinations in India ) फक्त ऑगस्ट महिन्यात झाले आहे, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. केंद्राचे अधिकृत हँडल ‘माय गव्ह इंडिया’वर ही माहिती दिली गेली आहे.

भारताने ऑगस्ट महिन्यात 180 दशलक्षांहून अधिक लस मात्रा दिल्या. कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रान्स आणि जपानचा समावेश असलेल्या सात राष्ट्रांच्या सर्व गटांपेक्षा ही संख्या जास्त असल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारने ट्विट केलेल्या आकडेवारीनुसार कॅनडाने ‘जी-7’ राष्ट्रांत अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वोच्च श्रेणीत तीन दशलक्ष लस मात्रा तर जपानने 40 दशलक्ष लस मात्रा दिल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात 180 दशलक्षांहून अधिक लस मात्रा दिल्याने आपल्या लोकसंख्येला प्राधान्याने लसी देण्यात भारत जागतिक पातळीवर सर्वात पुढे असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे. देशात आतापर्यंत करोना लसीच्या 68 कोटींहून जास्त मात्र दिल्या आहेत. महाराष्ट्रानेही लसीकरणाचा विक्रम नोंदवला आहे.

केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे

करोना संसर्गावर विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लसी जगातील नागरिकांसाठी वरदान ठरल्या आहेत. मात्र सध्या बनावट करोना लसी बाजारात आढळून आल्याने सरकारची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना प्रतिबंधक बनावट लसी बाजारात आल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बनावट लसींमुळे लसीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता संघटनेने वर्तवली आहे.

दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत एस्ट्राझेनेका/ऑक्सफोर्डच्या ‘कोविशिल्ड’च्या बनावट लसी आढळल्या असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच म्हटले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारांना बाजारात उपलब्ध बनावट करोना लस ओळखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com