भारताचे मिसाईल पाकिस्तानात कोसळले…

भारताचे मिसाईल पाकिस्तानात कोसळले…

दिल्ली | Delhi

भारताचे (India) एक मिसाईल (Missile) चुकीने पाकिस्तानात जाऊन पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्रालयाने (Defence Ministry) यास दुजाेरा दिला असून, तांत्रिक चुकीने मिसाईल डागले गेल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने (Central Govt) या घटनेची अतिशय गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी काेर्ट ऑफ इन्क्वायरीचे (Court of Enquiry) आदेश देण्यात आले आहेत, तर पाकिस्तानने (Pakistan) या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, भारताने उत्तर देण्याची मागणी केली आहे. (India Accidentally Fired Missile Into Pakistan, Says Defence Ministry)

भारताचे मिसाईल पाकिस्तानात कोसळले…
मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तांत्रिक बिघाडामुळे भारतातील एक क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडले. (missile landed in Pakistan) या घटनेबद्दल आम्ही दु:ख व्यक्त करतो. पाकिस्तानी लष्कराने एक दिवसापूर्वीच भारताकडून क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला होता. यामुळे काही भागात नुकसान झाले आहे.

पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या पंजाब (Panjab Pakisthan) प्रांतात पडले. पाकिस्तानी लष्कराचे (Pakisthan Army) प्रवक्ते मेजर जनरल इफ्तिखार यांनी सांगितले की, भारताकडून एक क्षेपणास्त्रासारखी वस्तू वेगाने आली. त्याच्या पडझडीमुळे काही भागात नुकसान झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com