
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतमोजणीस (Vote Counting)आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. दरम्यान २८ टेबलांवर मतमोजणी सुरु होती.
नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत असल्याचे चित्र होते . दरम्यान पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सत्यजित तांबे आघाडीवर होते.
मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या झाल्या असून पाचव्या फेरीची मतमोजणी नुकतीच पूर्ण झाली आहे. तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68999 तर पाटील यांना 39534 मते मिळालेत. पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे २९४५६ मतांनी आघाडी मिळवून विजयी झाले.
माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही.सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा.मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये असे आवाहन सत्यजित तांबे यांचे कडून करण्यात आले आहे.
पाचव्या फेरीचा निकाल पुढील प्रमाणे
सत्यजित सुधीर तांबे : 68999
शुभांगी भास्कर पाटील 39534
रतन कचरु बनसोडे :2645
सुरेश भिमराव पवार :920
अनिल शांताराम तेजा :96
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :246
अविनाश महादू माळी :1845
इरफान मो इसहाक :75
ईश्वर उखा पाटील :222
बाळासाहेब रामनाथ घोरपडे :710
जुबेर नासिर शेख :366
सुभाष राजाराम जंगले :271
नितीन नारायण सरोदे :267
पोपट सिताराम बनकर :84
सुभाष निवृत्ती चिंधे :151
संजय एकनाथ माळी :187
वैध मते :116618
अवैध मते :12297
एकूण :129615
कोटा:58310