पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरुन भाषण, काय आहेत महत्वाच्या घोषणा

पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरुन भाषण, काय आहेत महत्वाच्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 75 व्या स्वतंत्र दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन ध्वज फडकावला (75th Independence Day)आणि देशातील जनतेला संबोधित (PM Modi Speech) केलं. आपल्या 90 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. एक मुलींसाठी सैनिक शाळा तर दुसरी 100 कोटी रुपयांची गती शक्ती योजना.देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधानांनी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचा खास उल्लेख केला.

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 • मुलींनाही समान संधी मिळाली पाहिजे. मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. त्यामुळे आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुलींनाही प्रवेश देणार आहे.

 • भारत पुढच्या काही काळामध्ये प्रधानमंत्री गति शक्तीचा नॅशनल मास्टर प्लॅन देशासमोर ठेवणार आहे. १०० लाख कोटीपेक्षा अधिकच्या या योजनेच्या माध्यमातून लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. हा असा मास्ट्र प्लॅन असेल, जो हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरची पायाभरणी करेल.

 • जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार

 • नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा, भारताची ऊर्जा क्षेत्रातील मोठी प्रगती, जगात स्वच्छ उर्जासाठी भारताला ओळखलं जाईल

 • भारतासमोर दहशतवाद आणि विस्तारवाद या दोन समस्यांशी लढत आहे आणि त्याला चोख प्रत्त्युतर देखील देत आहे.

 • नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची एक अजून महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये स्पोर्ट्सला एक्स्ट्रा करिक्युलर ऐवजी मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा भाग बनवण्यात आले आहे. जीवनात पुढे जायचे असेल तर त्यामध्ये क्रीडा हेसुद्धा महत्त्वाचे प्रभावी माध्यम आहे.

 • आपल्याकडे जर स्वत:ची लस नसती तर? भारतात स्वत:ची पोलिओ लस मिळण्यासाठी किती वेळ गेला. पण आज आपण गर्वाने सांगू शकतो की, जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरु आहे.

 • भारतातील उत्पादकांनी त्यांचे उत्पादन भारताची ओळख असल्याचं लक्षात ठेवावं. जगाच्या बाजारपेठेवर आपलं अधिराज्य असावं हे स्वप्न देशातील उत्पादकांनी पाहावं. सरकार त्यांच्यासोबत उभं असेल. सरकार देशातील स्टार्ट-अपसोबतही उभं आहे

 • वाढत्या लोकसंख्यामुळे कुटुंबात विभागणी होऊन गावांमध्ये शेतकऱ्यांकडील जमिनीचं प्रमाण कमी होतंय. हे मोठं आव्हान आहे. सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं आधी दिलं गेलं नाही. आत्ता या शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जातंय

 • लवकरच ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वे मार्गाने जोडले जाईल. या राज्यांना देशाच्या विकासाचा भाग बनवावं लागेल. हे काम देशाच्या अमृतमहोत्सवाआधी पूर्ण करावं लागेल

 • उज्वला योजनेपासून आयुष्मानपर्यंत योजनांची ताकद सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, इतक्यावरच थांबायचं नाहीये. 100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, सर्वांकडे बँक खाते असावेत, सर्वांकडे आयुष्मान कार्ड असावे, घरकुल योजनेतून प्रत्येक हक्काच्या व्यक्तीला घर द्यायचं आहे

 • देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. म्हणूनच हा फाळणीचा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जाईल. या दिवशी फाळणीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com