नाशिकमधील 'या' बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द

नाशिकमधील 'या' बँकेचा परवाना रिझर्व बँकेकडून रद्द

नाशिक | प्रतिनिधी Nashik

रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून (Reserve bank of india) आज नाशिकमधील एका बँकेवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंडिपेंडन्स को ऑपरेटीव्ह बँकेचा (independence cooperative bank) परवाना रिझर्व बँकेकडून रद्द करण्यात आला आहे. व्यवहार बंद झाल्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. (independence cooperative bank licence cancel by reserve bank of india today)

अधिक माहिती अशी की, इंडिपेंडन्स को ऑपरेटीव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सहकार विभागाने (Co operation department) काही दिवसांपूर्वी रिझर्व बँकेला पाठवला होता. यासोबतच बँकेवर प्रशासकदेखील नियुक्त करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

ही बँक दिवाळखोरीत निघाली आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कामकाजासाठी योग्य ती स्थिती नसल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ५६ सह कलम ११(१) आणि कलम २२ (३) (d) या तरतुदीचे पालन बँकेने केले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच बँक नियमांचेही पालन झाल्याचे दिसून येत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बँकेचे चालू राहणे ठेवीदारांच्या हितासाठी अनुकूल नाही. सध्याची आर्थिक स्थिती असेलेली बँक तिच्या सध्याच्या ठेवीदारांना पैसे देऊ शकणार नाही. बँकेला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होतील असे रिझर्व बँकेने कारवाई करताना नोंदवले आहे.

यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला असून ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे समाविष्ट आहे. बँकिंग रेग्युलेशन कायदा (Banking regulation act) १९४९ च्या ६ अंतर्गत तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी हो असल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे.

बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर. प्रत्येक ठेवीदाराला ठेवींची पाच लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंतची ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल असेही म्हटले आहे. बँकेच्या आकडेवारीनुसार ९९ टक्क्यापेक्षा अधिक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची रक्कम dicgc कडून मिळण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com