भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय; मालिकेत १-० ने आघाडी

भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय; मालिकेत १-० ने आघाडी

नवी दिल्ली | New Delhi

भारत आणि बांगलादेश (India and Bangladesh) यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने दुसरा डाव २५८ धावांवर घोषित करून बांगलादेशला ५१३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करतांना बांगलादेशचा संघ ३२४ धावांपर्यंत मजल मारू शकला...

कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने पहिल्या सत्रात बांगलादेशचे उर्वरित फलंदाज बाद करत विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) पहिल्या डावात ९० धावा तर दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. याशिवाय गोलंदाजीत कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ३ गडी बाद केले.

दरम्यान, कालच्या ६ बाद २७२ वरुन बांगलादेशने आज पाचव्या दिवशी पुढे डाव सुरु केला असता केवळ ५२ धावांत चार गडी गमावले. त्यामुळे भारताने बांगलादेशवर १८८ धावांनी मोठा विजय (Win) मिळवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com