IND Vs Aus : भारताचा ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय

नागपूर | वृत्तसंस्था Nagpur

नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिअशनच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघावर सहा गडी राखून विजय मिळवत मालिकेत १ -१ अशी बरोबरी साधली. दरम्यान पावसाने व्यत्यय आल्याने सदर सामना हा ८ षटकांत खेळविण्यात आला.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून अ‍ॅ‍ॅरोन फिंच व कॅमेरोन ग्रीन प्रथम फलंदाजीस आले. सामन्याच्या दुसऱ्या षटकात विराट कोहलीने कॅमेरोनला धावबाद केले. पाठोपाठ ग्लेन मॅॅस्क्वेलला अक्षर पटेलने शून्यावर तंबूत परत पाठविले. टीम डेविडला अक्षर पटेलने त्रिफळाचीत केले. जसप्रीत बुमराहा ने अ‍ॅ‍ॅरोन फिंचला क्लीन त्रिफळा चीत केले. फिंचने १५ चेंडूत ३१ धावा केल्या.मॅथ्यू वेड्सने २० चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या. शेवटच्या आठव्या षटका अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या संघाने ५ गडी बाद ९० धावा केल्या.

भारतीय संघाकडून के.एल. राहुल व रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी करत दोन षटकातच ३० धावा कुटल्या. झम्पाने के.एल. राहुलला त्रिफळाचीत करत भारतीय संघास पहिला धक्का दिला. त्यानंतर मैदानात आलेला विराट कोहली ११ धावा करत तंबूत परतला. सूर्यकुमार यादव शून्यावर माघारी परतला. मात्र रोहित शर्माने आक्रमक खेळी करत २० चेंडूत नाबाद ४६ धावा झळकविल्या .अखेरच्या ओव्हरमध्ये 9 धावा हव्या असताना दिनेश कार्तिकनं 1 चौकार आणि एक षटकार ठोकून सामना भारताच्या खिशात घातला. त्यामुळे हैदराबादमध्ये होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *