'देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो' प्रदर्शनास वाढता प्रतिसाद

उद्या शेवटचा दिवस
'देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो' प्रदर्शनास वाढता प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील हजारो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे 'देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो'च्या ( Deshdoot Property Expo )दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. आज शनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून इंदिरानगर ( Indiranagar )आणि परिसरातील नागरिकांनी 'वीकएण्ड' चा पुरेपूर आनंद घेतला.

'देशदूत' आयोजित 'प्रॉपर्टी एक्स्पो'त सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. या पर्यायांना गृहवित्त पुरवठादार संस्थांची जोड लाभली आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग मानून नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत.

दुपारी ४ वाजेपासून सुरू झालेला गर्दीचा ओघ रात्री ९ पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली. इंदिरानगर परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष 'साईट व्हिजिट'ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. उद्या रविवारी प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जय डेव्हलपर्सचे संचालक विजय ललवाणी, ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक आकाश कापडणे आणि पूजा डेव्हलपर्सचे संचालक किशोर रूमाले यांच्या हस्ते लकी ड्रॉचे विजेते घोषित करण्यात आले.

लकी ड्रॉ विजेते

काबरा एम्पोरिअम कडून बक्षिसे : रुपाली देवकर, दीपेश मटकरी, प्रशांत दशपुत्रे

सुराणा ज्वेलर्स कडून बक्षिसे : साक्षी पवार; राजेश पंचभोई; आदेश जोशी

Related Stories

No stories found.