Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : 'देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो' प्रदर्शनास वाढता प्रतिसाद

Video : ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शनास वाढता प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील हजारो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो ‘च्या ( Deshdoot Property Expo-2022 )दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

- Advertisement -

आज शनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून पंचवटीकरांनी ‘वीकएण्ड’ चा पुरेपूर आनंद घेतला. ‘देशदूत’ आयोजित ‘प्रॉपर्टी एक्स्पो’त सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प (Projects of builders ) मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. या पर्यायांना गृहवित्त पुरवठादार संस्थांची जोड लाभली आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग मानून नागरिक सहकुटुंब गर्दी करीत आहेत.

दुपारी ४ वाजेपासून सुरू झालेला गर्दीचा ओघ रात्री ९ पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबीयांना पूरक माहिती देण्यात आली. पंचवटी परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यांत साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष ‘साईट व्हिजिट’ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. उद्या रविवारी प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजचे लकी ड्रॉ विजेते

सोनी पैठणीकडून बक्षिसे : संतोष अहिरे; व्ही. वाय. आहेर; सीमा शिंपी

टकले ज्वेलर्स कडून बक्षिसे : पूजा कदम; संभाजी पवार; शंकर गायकवाड

मान्यवरांची भेट…

नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनी पवार, आणि नगरसेवक जगदीश पाटील तसेच बांधकाम व्यावसायिक आदींनी प्रदर्शनास भेट देऊन मध्यमवर्गीयांच्या स्वप्नपूर्तीसाठी आयोजकांकडून होत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या