‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्सपो’ला वाढता प्रतिसाद

आज शेवटचा दिवस
‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्सपो’ला वाढता प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

युवकांपासून व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत विविध श्रेणीतील हजारो नागरिकांच्या भेटीचा ओघ हे क्रिश ग्रुप प्रायोजित ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्सपो’च्या ('Deshdoot Panchvati Property Expo') दुसर्‍या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. कालशनिवारची सायंकाळ स्वप्नातील घराच्या शोधात घालवून पंचवटीकरांनी वीकेंडचा पुरेपूर आनंद घेतला.

प्रॉपर्टी एक्सपोत सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प मध्यमवर्गीयांपासून उच्च मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वच घटकांना सुयोग्य पर्याय उपलब्ध करून देत आहेत. या पर्यायांना गृहवित्त पुरवठादार संस्थांची जोड लाभली आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग मानून नागरिक सहकुटुंब गर्दी करत आहेत. दुपारी 4 वाजेपासून सुरू झालेला गर्दीचा ओघ रात्री 9 पर्यंत सुरू होता. स्टॉलधारकांकडून प्रदर्शनात आलेल्या कुटुंबियांना पूरक माहिती देण्यात आली. पंचवटी परिसरातील घरांचे पर्याय प्रत्यक्ष डोळ्यात साठवता यावेत या उद्देशाने काही सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी प्रत्यक्ष ‘साईट व्हिजिट’ची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

रविवारी (दि.9) प्रदर्शनाचा समारोप होत आहे. नागरिकांनी दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तीन दिवसांत लकी ड्रॉतून संस्कृती पैठणीकडून पैठण्या आणि टकले ज्वेलर्स यांच्याकडून चांदीची नाणी भेट देण्यात येत आहेत. जे ग्राहक उपस्थित नव्हते त्यांनी येत्या 7 दिवसांच्या आत महात्मा गांधीरोड येथील दैनिक 'देशदूत' कार्यालयात संपर्क साधावा. ओळखपत्र दाखवून आपली बक्षिसे घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लकी ड्रॉ विजेते

संस्कृती पैठणीची बक्षिसे :

शुक्रवारचे विजेते : जया मोरे, नितेश येवले

शनिवारचे विजेते : जीवन वाघमारे, प्रदीप जगताप

टकले ज्वेलर्सची बक्षिसे :

शुक्रवारचे विजेते : पराग मोरे, मुमताज खान, संजय पाटील

शनिवारचे विजेते : एल. व्ही. निंबाळकर, सर्वेश साळवे, जगदीश मोरे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com