लाचखोरीचा आलेख वाढताच!

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 119 सापळ्यांची वाढ
लाचखोरीचा आलेख वाढताच!

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ACB 2021 मध्ये करण्यात आलेल्या कारवायांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी ऑक्टोबरअखेरपर्यंत 23 टक्क्यांनी कारवाई वाढल्याचे दिसून आले आहे. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत 119 ने कारवाया वाढल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरअखेरपर्यंत 518 सापळ्यांतून 710 आरोपी पकडण्यात आले होते. यावर्षी 637 सापळ्यांतून 896 आरोपी पकडण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या अखत्यारित असलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग Bribery Prevention Department शासकीय सेवक, अधिकारी यांच्यावर कटाक्षाने नजर ठेवत आहे. यामध्ये 1068 या क्रमांकावर आलेल्या तक्रारी असो किंवा कोणी फोनवर दिलेली माहिती असो तातडीने उपाययोजना करण्यात तत्पर असतात. तसेच केलेल्या कार्याची दैनंदिन माहिती लाचलुचपत विभागाच्या संकेतस्थळावर अद्ययावत केली जात आहे.

राज्यात 1 जानेवारी ते ऑक्टोबरअखेरपर्यंत एकूण 645 गुन्ह्यांत 918 आरोपींना पकडण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक सापळे आणि सर्वाधिक भ्रष्ट आरोपीदेखील पुणे परिक्षेत्रातच असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुणे परिक्षेत्रात 139 सापळ्यांमध्ये 201 आरोपी पकडण्यात आले आहेत. तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या औरंगाबाद परिक्षेत्रात 116 सापळ्यांमध्ये 163 आरोपी पकडण्यात आले आहे. सर्वात कमी 44 सापळे मुंबई परिक्षेत्रात झाले असून यात 61 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी कडक लॉकडाऊनअसतानाही भ्रष्टाचार आणि त्याअनुषंगाने सापळे कमी झाले नव्हते; त्यातच आता लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असून, अनेक कार्यालयीन कामकाज सुरू झाले आहेत. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यांनीही गती पकडली आहे. लाचखोरीमध्ये नेहमीप्रमाणे महसूल, पोलिस हे अग्रेसरच आहे.

दरम्यान, राज्यात यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबरअखेरपर्यंत सापळ्यांची संख्या 637 इतकी झाली. यात 896 आरोपी लाच घेताना अटक झाले, तर 645 गुन्हे दाखल होऊन 918 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com