Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याघरपट्टी वसुलीसाठी वसुली विभागाचे वाढले टार्गेट

घरपट्टी वसुलीसाठी वसुली विभागाचे वाढले टार्गेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या घरपट्टी विभाग (house tax department) वार्षिक उद्दिष्ट वसुलीच्या जवळ असतानाच शासनाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी नवा फतवा आला असून,

- Advertisement -

पंधराव्या वित्त आयोगानुसार (Finance Commission) हे उद्दिष्ट 158 कोटींवरून थेट 27 कोटी रुपयांची वाढ करीत 185 कोटी रुपये करण्याचे निर्देश दिल्याने वसुली अधिकारी व कर्मचार्‍यांची चिंता वाढली आहे.

घरपट्टी (house tax) हे महापालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असले तरी मुळातच दरवर्षी उद्दिष्टपूर्ती होत नाही. दरवर्षी उद्दिष्टपूर्ती वाढते. मात्र, मागील थकबाकी (arrears) तशीच राहाते. ही थकबाकी तीनशे कोटी रुपयांच्या घरात आहे. चालू वर्षी घरपट्टी वसुली विभागाला (House Tax Recovery Department) 158 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दिवाळी पूर्वी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाव अभियान राबवण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यानंतर वसुली काही प्रमाणात वाढली. दरम्यान, आता जानेवारी अखेर 144 कोटी रुपये वसूल झाल्याने यंदा उद्दिष्टापेक्षा अधिक आहे. वसुलीची शक्यता निर्माण झाली.

मात्र, पंधराव्या वित्त आयोगानुसार (Finance Commission) वाढला आहे. जानेवारी अभय योजनेतून 45 कोटी रुपयांची झाली होती वसुली वर्षभरापूर्वी महापालिकेने कर्ज वसुलीसाठी अभय योजना राबवली होती. तीन टप्प्यांत राबवलेल्या मोहिमेत 45 कोटी रुपयांची वसुली झाली होती. गेल्या वर्षभरात मात्र कोणत्याही प्रकारे अशी मोहीम राबवली गेली नाही. त्यातच घरपट्टी वसुली कर्मचायांना प्रभाग रचनेचे आक्षेप आणि अन्य कामे करावी लागली.

नवीन उद्दिष्टाने चिंता वाढली

दोन दिवसांपूर्वी पंधराव्या वित्त आयोगानुसार नवीन उद्दिष्ट वाढवून देण्यात आले असून, त्यानुसार आता 185 कोटी रुपये इतकी वसुली करावी लागणार आहे. वसुलीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या वसुलीच्या तुलनेत 30 टक्के इतके वाढवण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षीदेखील अशाच प्रकारे पंधराव्या वित्त आयोगानुसार उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळे आता महापालिकेपेक्षा वित्त आयोगाच्या आदेशाने ताण वाढल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या