Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याइंधनदर वाढले, सीएनजी करावे तर गॅसचा तुटवडा; वाहनधारक संभ्रमात

इंधनदर वाढले, सीएनजी करावे तर गॅसचा तुटवडा; वाहनधारक संभ्रमात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिवसेंदिवस इंधन दारात वाढ (Fuel rates increase) होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचा पेट्रोल (petrol) व डिझेला (Diesel) पर्याय म्हणून सी. एन. जी. (CNG आणि इलेकट्रीक वाहनांकडे (electric vehicle) कल वाढत आहे. वाहन कंपन्या (Vehicle companies) ग्राहकांचे सी. एन. जी. (CNG) आणि इलेकट्रीक वाहनांकडे वाढणारे काल पाहता सी. एन. जी. वाहनांची निर्मितीत वाढ करत आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर बाजारात सी. एन. जी. किट (CNG Kit) उपलब्ध होत आहे. हे किट कोणत्याही चारचाकीला लावणे शक्य होत असल्याने वाहनधारक पेट्रोल गाड्यामध्ये (Petrol cars) आता सी. एन. जी. किट लावत आहे. त्यामुळे सी. एन. जी. गाड्यांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु शहरात सी. एन. जी. गॅसपंपाची (Gas pump) संख्या कमी असल्याकारणाने गॅसपंपांवर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहे. परिणामी गॅसपंपावर गोंधळ निर्माण होत आहे.

सी. एन. जी. गॅससाठी अशीही वणवण

सी. एन. जी. गॅस भरण्यासाठी पूर्ण दिवस गाडी रांगेत उभी करावी लागत आहे. काही वेळा रात्री गाडी रांगेत लाऊन सकाळी गॅस (gas) भरण्यासाठी नंबर लागत आहे. त्यामळे काही वाहनचालकांना गॅसपंपावरच रात्र काढावी लागत आहे. एवढे होऊनही वाहनधारकाचा सकाळी नंबर लागल्यानंतर पंपावरील काही वशिलेबाजांचे गॅस भरण्यासाठी पहिले नंबर लागत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भांडण व हाणामारीही होत आहे.

गॅसपंप होणार ऑनलाईन

सध्या सी. एन. जी. गॅस (CNG) पुण्याहून (pune) नाशिक (nashik) आणले जात आहे. परंतु आता विल्होळी (vilholi) येथे सी. एन. जी. गॅसस्टेशन (CNG Gas station) सुरु होत आहे. विल्होळी पासून गॅस पाईपलाईनद्वारे (Gas pipeline) नाशिक पर्यंत पोहोचणार असून विल्होळी ते गॅसपंप पर्यंतचे गॅसचे वितरण ऑनलाईन (online) होणार आहे. सध्या या प्रणालीची चाचण्या चालू आहे. चाचण्या यशस्वी झल्यानंतर सी. एन. जी. गॅसची सुविधा सुरळीत होणार आहे.

इंधन दरवाढ होण्याची शक्यता

सध्या चालू असलेल्या रशिया- युक्रेन (Russia-Ukraine) युद्धामुळे (war) आंतरराष्ट्रीय बाजारात (International market) एक बॅरलचा दर एकशे पाच डॉलर एवढा वाढला आहे त्यामुळे इंधन दारात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या