Photo : गोदाकाठी दुकानदारांची अशी झाली धावपळ

Photo : गोदाकाठी दुकानदारांची अशी झाली धावपळ
Published on

नाशिकमध्ये गोदावरीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नारोशंकराचे मंदिर दुपारी सव्वातीनच्या सुमारास अर्ध्यापेक्षा अधिक बुडाल्याचे दिसून आले.

होळकर पुलाखालून (Holkar Bridge) सद्यस्थितीत ११ हजार २१० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरु आहे. यामुळे दुकानदारांची धावपळ सुरु झाली.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gangapur water catchment area) पावसाची संततधार सुरु असल्यामुळे सकाळी आठ वाजेपासून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवला जात आहे.

दुकानदारांनी सकाळीच दुकानातील सामान काढून घेतले. तसेच टपऱ्या वाहून जाऊ नये म्हणून त्या सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आपली दुकाने वाचवण्यासाठी विक्रेते प्रयत्न करत आहे. त्यासाठी एकमेकांना मदत करत आहे.

नदीकाठी असलेल्या दुकानांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी शिरले आहे. दुकानातील ऐवज वाचवण्यासाठी धावपळ केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com