Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याडिफेन्स मॅन्युफ्क्चरिंग हबच्या निर्मितीसाठी वेंडरची संख्या वाढवा

डिफेन्स मॅन्युफ्क्चरिंग हबच्या निर्मितीसाठी वेंडरची संख्या वाढवा

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

देशाचा सर्वाधिक खर्च हा सुरक्षेच्या निगडीत साधन – सामुग्री आणि शस्त्र (Weapon) यावर होत असून अशी शस्त्र व सामुग्री जर देशात तयार झाली तर मोठया प्रमाणावर परकीय चलन (Foreign currency) वाचणार आहे.

- Advertisement -

त्यासाठी देशातील मोठ्या शहरात असे हब निर्माण करावेत. नाशिक हे डिफेन्स हबची निर्मिती (Creation of Defense Hub) करण्यासाठी उपयुक्त शहर असून येथे वेंडरची (vendor) संख्या वाढवावी, असे आवाहन खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी केले.

खा. गोडसे यांच्या पुढाकाराने आणि अभ्युदय भारत मेगा डिफेन्स क्लस्टर (Abhuday Bharat Mega Defense Cluster) या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने अंबड औद्योगिक वसाहतीमधील (Ambad Industrial Estate) नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या (Nashik Engineering Cluster) सभागृहात आज सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना गोडसे यांनी डिफेन्स हब (Defense Hub) व वेंडर याबाबत सविस्तर माहिती दिली. व्यासपीठावर अभ्युदय भारत मेगा डिफेन्स क्लस्टरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक धवन रावळ, कार्यकारी अधिकारी मोहित श्रीवास्तव, नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष विक्रमभाऊ सारडा (President of Nashik Engineering Cluster Vikrambhau Sarda) उपस्थित होते.

नाशिक (Nashik) हे मुंबई (Mumbai), पुणे (Pune), औरंगाबाद (Aurangabad) या सुवर्ण त्रिकोणातील महत्वाचे शहर असून शहराला मोठी कनेक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी डिफेन्सच्या निगडीत ओझर (Ozar) येथील एचएएल (HAL), देवळाली कॅम्पजवळील आर्मी सेक्टर (Army Sector) तर स्कूल ऑफ आर्टिलरी (School of Artillery) अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. डिफेन्स हबसाठी लागणार्‍या सर्वच बाबी शहरात अनुकूल आहेत.

याचा फायदा घेण्यासाठी डिफेन्स निगडीत असलेल्या शहरातील उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी शहरात डिफेन्स हबची निर्मिती व्हावी, अशी मागणी उद्योजकांकडून खा. गोडसे यांच्याकडे सतत होत होती. त्यांची दखल घेत खा. गोडसे यांनी सतत डिफेन्स हबसाठी प्रयत्न चालविलेले आहेत.

त्यास आता यश येवू लागले आहे. सुरुवातीला अभ्युदय कंपनीने गेल्या दहा वर्षातील आपल्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. डिफेन्स निगडीत शस्त्र प्रकल्प उभारणी प्रचंड खर्चिक असल्याने त्यास मर्यादा येत असतात. परंतु शस्त्रांचे सुटे भाग निर्मिती करण्यासाठी लघु व्यवसाय (वेंडरशीप) (Small business) उभारणे सोपे असते. शेकडो वेंडर एकत्र आल्यास हबची निर्मिती करता येते.

हब क्लस्टरमुळे डिफेन्सच्या क्षेत्रातील वेंडरच्या व्यवसायाला चालना मिळून व्यवसायाची भरभराट तर होतेच शिवाय आपण राष्ट्रासाठी काही तरी करत असल्याचे समाधानही मिळत असते असे स्पष्ट करत शहरात डिफेन्स हबसाठी पोषक वातावरण असून आजमितीस सुमारे अडीचशे असलेली वेंडरची संख्या हजाराच्या घरात जाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन खा. गोडसेंसह धवन रावळ यांनी केले. हबमुळे शहरातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांंनाही लाभ होणार असल्याचे यावेळी रावळ यांनी स्पष्ट केले.

डिफेन्स क्षेत्राला भविष्यात मोठी संधी असून अधिकाधिक वेंडरांनी क्लस्टर योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सेवानिवृत्त कर्नल आनंद यांनी व्हर्च्युअलच्या माध्यमातून केले. क्लस्टर निर्मितीसाठी बँकांकडून होणार्‍या अर्थपुरवठयाची माहिती संचिता मुजूमदार यांनी दिली. कार्यक्रमास सुरेंद्र माधुर, विवेक पाटील, कर्नल सारंग काशिकर,

मनीष कोठारी, ज्ञानेश्वर गोपाळे, उत्तमराव शिंदे, विकास पाटील, श्रीपाद कुलकर्णी, प्रज्ञा पाटील, श्रद्धा कोतवाल, डॉ. कुवर, सचिन फडके, वैभव पाटील, कॉप्टन आगाशे, रिलायबलचे खेडेकर, डॉ. गायत्री फडे, एम.जी. कुलकर्णी, मिलौद चिचोलीकर, डॉ. प्रशांत पाटील, मकरंद बेलगावकर, सुभाष पाटील, दवंगे आदींसह डिफेन्स व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या