सावध व्हा: नाशिकमध्ये रुग्णसंख्येत एकाच दिवसांत २९९ ने वाढ

सावध व्हा: नाशिकमध्ये रुग्णसंख्येत एकाच दिवसांत २९९ ने वाढ

नाशिक (nashik) जिल्ह्यात कोरोना (corona)रुग्णसंख्येत गेल्या आठवड्यापासून झपाट्याने वाढ होत आहे. दररोज उच्चांकी रुग्ण आढळून येत आहे. गुरुवारी (दि.६) दिवसभरात ५३८ नवे रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले होती. त्यानंतर शुक्रवारी त्यात तब्बल २९९ ने वाढ झाली. शुक्रवारी नाशिकमध्ये ८३७ कोरोना (corona)रुग्ण आढळली. आज १३८ रुग्ण बरे झाले आहेत.

सावध व्हा: नाशिकमध्ये रुग्णसंख्येत एकाच दिवसांत २९९ ने वाढ
श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले...

नाशिक शहर ६२२, नाशिक ग्रामीण १७३, मालेगाव ५ आणि जिल्ह्याबाहेरील ३७ रुग्णांचा समावेश आहे. त्यात दिलासादायक म्हणजे दिवसभरात नाशिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू नाही.

नवीन वर्षांत करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट उभे ठाकले आहे. मागील आठ ते दहा दिवसांत करोनाच्या रुग्णसंख्येत चौपट वाढ झाल्याकडे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लक्ष वेधले. या लाटेचा प्रसार अतिशय वेगाने होत आहे. त्यास स्वयंशिस्त हे प्रभावी उत्तर असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच काल पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही कोरोनाच्या नियमांचे पालन न झाल्यास निर्बंध कठोर करण्याचा इशारा दिला होता.

Related Stories

No stories found.