Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्येत वाढ ; आज ३८ बळी

जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्येत वाढ ; आज ३८ बळी

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून यामध्ये नाशिक शहराने सातत्याने आघाडी राखली आहे. याबरोबर ग्रामीण भागात हा प्रसार वाढला आहे. मात्र आज करोना पॉझिटिव्हपेक्षा मुक्त होणारांचे प्रमाण मोठे असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. आज एकाच दिवसात 5 हजार 387 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान जिल्ह्यात आज दिवसभरात 4 हजार 718 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्याने अडीच लाखाचा टप्पा पार केला आहे.

- Advertisement -

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात करोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. शुक्रवारी यात घट होऊन हा आकडा 4 हजार 435 इतका झाला होता. परंतु आज यात थोडी वाढ झाली आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 2 लाख 58 हजार 21 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात 5 हजार 387 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 17 हजार 455 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 4 हजार718 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 2 हजार 459 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 56 हजार 938 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 2 हजार 199 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 87 हजार 314 झाला आहे. मालेगावात 31 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 10 हजार 250 झाला आहेे. जिल्हा बाह्य 29 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 519 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज एकाच दिवसात जिल्ह्यात 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 20 रूग्ण, नाशिक शहरातील 17, मालेगाव 1 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 895 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढतत चालला असून मागील चोवीस तासात 4 हजार 790 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 4हजार 379 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 313 तर मालेगाव येथील 61 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,58,021

* नाशिक : 1,56,938

* मालेगाव : 10,250

* उर्वरित जिल्हा : 87,314

* जिल्हा बाह्य ः 3,519

* एकूण मृत्यू: 2,895

* करोनामुक्त : 2,17,455

- Advertisment -

ताज्या बातम्या