नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ; आज ४० बळी

दिवसभरात जिल्ह्यात 5 हजार 749 पॉझिटिव्ह
नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ; आज ४० बळी

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून यामध्ये नाशिक शहराने सातत्याने आघाडी राखली आहे. याबरोबर ग्रामिण भागात हा प्रसार वाढला आहे. आज एकाच दिवसात पुन्हा एकदा 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पॉझिटिव्हमध्ये हजाराने वाढ होऊन हा आकडा 5 हजार 749 पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह येणारांची संख्या 2 लाख 63 हजार 770 इतकी झाली आहे.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात करोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी यात घट होऊन हा आकडा 4 हजार 718 इतका झाला होता. परंतु आज यात हजारने वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 913 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 2 लाख 22 हजार 368 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 5 हजार749 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 3 हजार 365 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 60 हजार 303 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 2 हजार 249 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 89 हजार 563 झाला आहे. मालेगावात 50 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 10 हजार 300 झाला आहेे. जिल्हा बाह्य 85 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 604 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज एकाच दिवसात जिल्ह्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 21 रूग्ण, नाशिक शहरातील 17, मालेगाव 2 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 935 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढतत चालला असून मागील चोवीस तासात 5 हजार 412 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 5 हजार 39 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 301 तर मालेगाव येथील 43 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 2,63,770

* नाशिक : 1,60,303

* मालेगाव : 10,300

* उर्वरित जिल्हा : 89,563

* जिल्हा बाह्य ः 3,604

* एकूण मृत्यू: 2,935

* करोनामुक्त : 2,22,368

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com