Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढली

नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढली

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आज एकाच दिवसात अडीच हजार नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. बुधवार (दि.17) पासून सलग तिसर्‍या दिवशी जिल्ह्याचा पॉझिटिव्हचा आकडा दोन हजार पार झाला असल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्याचा करोना रूग्णांचा आकडा 1 लाख 43 हजार 395 इतका झाला असून ही दीड लाखाकडे वाटचाल असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात दररोज सरासरी एक हजार ते दीड हजार नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल होत आहेत. शुक्रवारी हा आकडा अचानक 2 हजार 508 वर पोहचला आहे. परिणामी आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 43 हजारच्यावर पोहचला आहे. तर सध्या जिल्हाभरात 13 हजार 715 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

करोना रूग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाच्या चिंताही वाढल्या आहेत. मार्च 2020 पासून जिल्ह्यातील आतापर्यंत करोना पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 43 हजार 395 इतका झाला आहे. अवघ्या 10 दिवसात 25 हजार करोना रूग्ण वाढले आहेत.

नागारीकांचे मास्क, सॅनिटायझर वापर, करोना नियम पाळण्याबाबत झालेले दुर्लक्ष, बदलते वातावरण यामुळे पुन्हा करोनाने जिल्ह्यात वर डोके काढल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मागील चोवीस तासात 1 हजार 168 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 27 हजार 478 वर पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यात एकुण करोना मुक्तीचे प्रमाण घसरून 97 टक्केंवरून घसरून 88 टक्केंवर खाली आले आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 2 हजार 508 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 1 हजार 414 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 93 हजार 350 वर पोहचला आहे. आज ग्रामिण भागातील 853 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 41 हजार 484 झाला आहे. मालेगावात 182 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 6 हजार 825 झाला आहेे. जिल्हा बाह्यचा आकडा 1 हजार 736 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून यामध्ये आज वाढ झाली जिल्ह्यात 5 रुग्णांचा मृत्यू होत आहे. यात नाशिक शहरातील 1 तर ग्रामिण भागातील 3 व एक जिल्हाबाह्य आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 202 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात 2 हजार 430 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 2 हजार 262 रूग्ण नाशिक शहरातील आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 1,43,395

* नाशिक : 93,350

* मालेगाव : 6,825

* उर्वरित जिल्हा : 41,484

* जिल्हा बाह्य ः 1,736

* एकूण मृत्यू: 2,202

* करोनामुक्त : 1,27,478

- Advertisment -

ताज्या बातम्या