'या' पाच राज्यांमध्ये पसरतोय कोरोना

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. पवार यांनी दिली माहिती
'या' पाच राज्यांमध्ये पसरतोय कोरोना

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

देशात अद्याप अशी पाच राज्ये अशी आहेत, जिथे सर्वात जास्त कोरोना (Corona) रुग्ण आढळून येत आहेत. याबाबत केंद्र सरकारने (Central Government) चिंता व्यक्त करत या राज्यांमध्ये केंद्रीय आरोग्य पथक पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिली आहे...

खा. डॉ. भारती पवार म्हणाल्या की, करोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारने यापूर्वीच आपले पथक पाठविले आहेत. महाराष्ट्र (Maharashtra), केरळ (Kerala), कर्नाटक (Karnataka), तामिळनाडू (Tamil Nadu), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) या राज्यांमध्ये अजूनही कोरोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत नाही.

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहे. जुलैच्या सुरुवातीस पहिल्या १० दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या १६ महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पाहायला मिळाली आहे.

महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांत ७९ हजार ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर, सातारा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे (ग्रामीण) आणि सांगली ही या जिल्ह्यांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com