जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रात वाढ

जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रात वाढ

नाशिक । विजय गिते Nashik

जिल्ह्यात यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत सरासरी पेक्षाही अधिक पाऊस Rain झाला असल्यामुळे जिल्ह्यात ऊस लागवडीखालील क्षेत्रामध्ये sugarcane cultivation in the district तब्बल एक हजार 362 हेक्टरने वाढ झाली आहे.

यामध्ये सर्वाधिक ऊस लागवडीचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी निफाड तालुक्यामध्ये आहे.याबरोबरच सटाणा, नांदगाव,त्र्यंबकेश्वर,इगतपुरी या तालुक्यांमध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. या तुलनेत मालेगाव,कळवण, देवळा, दिंडोरी, नाशिक, सिन्नर, येवला या तालुक्यात ऊस लागवडीखालील क्षेत्रामध्ये मात्र घट झाली आहे.

जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने बंद अवस्थेत असून याचाही काहीसा परिणाम ऊस लागवडीवर होत आहे. यामागील कारण म्हणजे पिकविलेला ऊस जिल्ह्याबाहेर नेण्यास मोठा आर्थिक खर्च होत असल्याने शेतकरी या पिकाकडे वाळण्यासाठी विचार करत आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावर असलेला विठेवाडी आणि कादवा हे दोनच साखर कारखाने सुरू आहे.रानवड,द्वारकाधीश आणि रावळगाव हे तीन कारखाने खाजगी तत्वावर सुरू आहे.यामुळे निफाड,सिन्नर,येवला या तालुक्यातील ऊस हा शेजारच्या नगर जिल्ह्यातील संगमनेर,कोळपेवाडी, संजीवनी या साखर कारखान्यांना द्यावा लागत आहे.परिणामी निफाड तालुक्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले असले, तरी सिन्नर तालुक्यात मात्र, गटवर्षीच्या तुलनेत 863 हेक्टर तर येवला तालुक्यात 1218 हेक्टरने क्षेत्र घटले आहे.

चांदवड व पेठ तालुक्यात यावर्षी उसाची कुठेही लागवड झालेली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.नाशिक तालुक्यामध्येही 1407 हेक्टर, दिंडोरी तालुक्यात 1099 हेक्टर इतके ऊस लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. याबरोबरच मालेगाव 93 हेक्टर, कळवण 249 हेक्टर,देवळा 36 हेक्टर इतकी लागवड कमी झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात सरासरी पेक्षाही अधिक पाऊस झाला तर काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.याचाही परिणाम कमी अधिक ऊस लागवडीवर झाला आहे.

डसेंबर अखेर सन 2021-22 मधील ऊस लागवडीखालील क्षेत्र हेक्टरमध्ये :

कंसात गतवर्षीची लागवड

मालेगाव - 205 (297),

सटाणा - 1382 ( 1123),

नांदगाव - 329 (232),

कळवण -439 (687 ),

देवळा - 30 (66),

दिंडोरी -731 (1830),

सुरगाणा - 9 (9),

नाशिक - 1185 (1247),

त्र्यंबकेश्वर -112 (69),

इगतपुरी - 842 (130),

निफाड - 7326 (4737),

सिन्नर - 585 (1448),

येवला - 230 ( 157),

एकूण - 13404 (12043).

Related Stories

No stories found.