साखर निर्यातबंदीत वाढ

साखर निर्यातबंदीत वाढ

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

केंद्र सरकारने ( Central Government ) साखरेच्या निर्यातीवरील बंदी (Ban on export of sugar) एक वर्षासाठी वाढवली आहे. साखर निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश आहे.

देशातील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती. निर्यातीवरील ही बंदी 31 ऑक्टोबर रोजी संपणार होती, जी आता एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com