सातपूर । प्रतिनिधी

शासनाने दिलेल्या मुद्रांक शूल्क सवलतीच्या अखेरच्या तारखेला मुद्रांक शुल्क कार्यालयात लाभ घेण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते. सवलत जाहीर केल्यापासूनच्या मागील तीन महिन्यात सुमारे 40 हजार नागरिकांनी घरांची नोंदणी करुन सवलतीचा लाभ घेतलेला आहे. नोंदणीतील ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत दीड पटीने वाढल्याचे चित्र आहे.

करोना काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. त्यामुळे घर घेणे त्यांची नोंदणी करणे हे काम ठप्प होते. करोना अनलॉक नंतरच्या काळात बांधकाम व्यवसायाला गती देण्यासाठी शासनाने ऑक्टोंबर 2020 पासून मुद्रांक शुल्क दरात 3 टक्के सवलत जाहीर केली होती. शासनाच्या या निर्णयामुळे घर घेणार्या नागरीकांनी आपल्या घराची नोंदणी करण्यासाठी उत्साह दिसून आला होते. या सवलतीचा लाभ घेत सुमारे 40 हजार वास्तूधारकांनी नोंदणीसाठी पूढाकार घेतला आहे.

करोनामुळे शासनाने कामकाजाचा 5 दिवसांचा आठवडा केलेला असल्याने नाशिककरांची गैरसोय होणार होती. कामगार वर्गाला शनिवारी सूटी राहत असल्याने त्यांना सूटीच्या दिवसाचा सुयोग्य वापर करता यावा यासाठी नाशिक कार्यालय सूरू ठेवण्याचा निर्णय मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी घेतला होते. सुटीच्या रविवारी देखिल प्रलंबीत असलेली कामे उरकण्यावर भर दिल्याने कामाचा उरक वाढला. परिणामी नोंदणी प्रक्रिया जास्त गतिमान करणे शक्य झाल्याचे चित्र होते.

महिना 2019 2020

ऑक्टोबर 8845 13662

नोव्हेंबर 10064 12578

डिसेंबर 10422 13510