वाहन नोंदणीतून प्रादेशिक परिवहन विभागाच्या महसुलात वाढ

56 हजार 704 वाहनांची नोंद
वाहन नोंदणीतून प्रादेशिक परिवहन विभागाच्या महसुलात वाढ

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

नाशिक प्रादेशिक परिवहन विभागात दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू शेती रिक्षा रुग्णवाहिका व इतर सर्व वाहन नोंदणी माध्यमातून जवळपास 56 हजार 704 नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली. नवीन वाहन नोंदीच्या माध्यमातून जानेवारी ते डिसेंबर 2022 या वर्षभराच्या कालावधीत 299 कोटी 94 लाख 25 हजार 562 रुपये इतका महसूल प्रादेशिक पर्यावरण विभागाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

गतवर्षी प्रादेशिक परिवहन विभागाला नवीन वाहन नोंदणीच्या माध्यमातून जमा झालेल्या महसुलामुळे शासनाच्या आर्थिक तिजोरीत कोट्यावधी रुपयांची मोठी आर्थिक भर पडली आहे. दोन वर्षांपूर्वी पसरलेले करोना महामारी संकट बर्‍यापैकी दूर झाल्याने नागरिकांचा वाहन खरेदीकडे कल वाढला.

2021 मध्ये 700619 वाहन नोंदणीच्या माध्यमातून परिवहन विभागाला 224 कोटी 91 लाख 46 979 रुपये इतका महसूल प्राप्त झाला होता. यंदा वाहन संख्या वाढल्याने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरी तब्बल 45 कोटी रुपयांचा महसूल वाढला आहे.

2022 मध्ये चारचाकी मोटार वाहन नोंदणीतून 226 कोटी 51 लाख 89 हजार 907 रुपये तर 600808 नवीन दुचाकी वाहन नोंदणी माध्यमातून सुमारे 58 कोटी 29 लाख 90 हजार 450 रुपये महसूल प्राप्त झाला आहे. वर्षभराच्या कालावधीत जवळपास 60000505 नव्या दुचाकी तर 17 हजार 47 मोटार कारची नोंदणी झाल्याने आरटीओच्या महसुलात भर पडली आहे.

2021 या वर्षभरात 7000619 वा नोंदणी झाली होती तर नवीन वाहन नोंदणीच्या माध्यमातून सुमारे सव्वा दोनशे कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होत. मात्र यंदा वाहन संख्या 14 हजारांनी वाढली असून 75 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल जमा झाला आहे. दुचाकी वाहनांमध्ये 11000 तर चारचाकी वाहनांमध्ये 4000 वाहन संख्या वाढली आहे.

दुचाकी पाठोपाठ मालवाहू वाहनांची नोंदणी झाली असून 5280 वाहन नोंदणीतून 11 कोटी 45 लाख 74 हजार 841 रुपये महसूल जमा झाला आहे. 893 थ्री व्हीलर प्रवासी वाहन नोंदणीतून 36 लाख 14 हजार 530 रुपये तर 816 शेतकी ट्रॅक्टर नोंदणी झालेली आहे. सर्वात कमी वाहन नोंद ब्रेक डाऊन कॅश वाहन ही रिक्षा मोबाईल क्लीनिक ओमनी बस अशा संवर्गातील प्रत्येकी केवळ एक वाहनांची नोंदणी झाली आहे.

मोपेड 764, मोटार गॅप 171, डंपर 212, बस 178 व थ्री व्हीलर मालवाहू 214 वाहनांची नोंद झाली आहे. 212 डंपर वाहन नोंदणीतून एक कोटी ते 30 लाख 63 हजार 954 रुपये महसूल जमा झाला आहे. 22 नव्या रुग्णवाहिका नोंदणी वर्षभरात झाली असून एक लाख 98 हजार 652 रुपये कर मिळाला आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाला केवळ नवीन दुचाकी, चारचाकी वाहन नोंदणी माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल गेल्या वर्षी 2022 मध्ये प्राप्त झाला आहे तर आकर्षक क्रमांक तसेच वायू वेग पथकाची कारवाई वाहतूक नियमांचे उल्लंघन यातून केलेल्या कारवाईतून कोट्यवधींची भर शासन तिजोरी पडली आहे.

रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. दुचाकी चालकांनी डोक्यात हेल्मेट परिधान करावे व चारचाकी वाहनधारकांनी वाहन चालवताना सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक तसेच अतिभार वाहतूक टाळत सुरक्षित वाहन चालवावे.

-प्रदीप शिंदे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com