Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यादिवाळीच्या पाच दिवसांत प्रदूषणात वाढ

दिवाळीच्या पाच दिवसांत प्रदूषणात वाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (State Pollution Control Board)शहरांच्या विविध भागांमध्ये उभारलेल्या प्रदूषण मापन यंत्रणांद्वारे मिळालेल्या आकडेवारीनुसार दिवाळीआधीच्या दिवाळीच्या पाच दिवसांच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हवेतील प्रदूषण दिवाळीतील आतषबाजीमुळे तिपटीने वाढल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नाशिक शहरात पाच ठिकाणी दिवाळीत प्रदूषणासह फटाक्यांचा ध्वनी मोजला जातो. नाशिक शहरासाठी उद्योगभवन इमारत, केटीएचएम कॉलेज, औद्योगिक वसाहत सातपूर, आरटीओ कॉलनी (गोल्फ क्लब), राजीव गांधी भवन या ठिकाणी मापन यंत्र बसवण्यात आलेले आहेत.

सलग तीन-चार वर्षांत राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकचे ध्वनी व हवेची गुणवत्ता शुद्ध असल्याचे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात इतर दिवसांच्या मानाने यंदाच्या पाच दिवसांच्या दिवाळीत प्रदूषणात कमालीची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

2019 च्या दिवाळीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 110 होता. करोनाच्या काळात 2020 व 2021मध्ये प्रदूषणाचा स्तर खाली आला होता. 2022 मध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आल्याने हवेतील प्रदूषण 146 पर्यंत नोदवण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या