Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात ३० गाड्यांच्या पे़ट्रोलची चोरी

नाशकात ३० गाड्यांच्या पे़ट्रोलची चोरी

नवीन नाशिक | New Nashik

तोरणा नगर व सावता नगर येथील सुभाषचंद्र बोस गार्डन परिसरात गल्लीबोळात असलेल्या तब्बल २५ ते ३० दुचाकींचे पेट्रोल चोरी झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

तसेच नागरिकांच्या घराच्या खिडक्या फोडून मोबाईल चोरी करण्याचाही प्रकार या ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून मोबाईल चोरी प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रभाग २९ येथील तोरणा नगर व सावता नगर येथील सुभाषचंद्र बोस गार्डन परिसरात परिसरात मध्यरात्री चोरट्यांकडून तब्बल २५ ते ३० दुचाकींचे पेट्रोल कॉक तोडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री एकाच वेळी अनेक दुचाकीतील शेकडो लिटर पेट्रोलची चोरी चोरट्यांनी केली असून पेट्रोलचे कॉक, पेट्रोल नळ्या ही तोडून टाकल्याने सकाळी आपल्या कामावर जाताना नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. यावेळी परिसरातील अनेक दुचाकी मधून पेट्रोल चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत येथील नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र पेट्रोल चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कुणी फिर्यादी समोर आले नाही. या प्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

सीसीटीव्ही च्या आधारे संशयितांचा तपास सुरू आहे. नागरिकांनी तक्रार करण्यासाठी पुढे यावे व काही संशयितांबद्दल माहिती असल्यास कळवावी. त्यांचे नाव गुपीत ठेवण्यात येईल.

– कुमार चौधरी, वपोनी अंबड पोलीस ठाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या