शहरात एच3 एन2 रुग्ण संख्येत वाढ; स्वच्छता बाळगण्याचे मनपाचे आवाहन

शहरात एच3 एन2 रुग्ण संख्येत वाढ; स्वच्छता बाळगण्याचे मनपाचे आवाहन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक (nashik) शहरात एच3 एन2 (H3N2) रुग्ण संख्येत वाढ झालेली असून, फेब्रुवारी महिन्यात 2 तर मार्च महिन्यात दोन रुग्ण उपचारासांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या चार रुग्णांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झालेले आहे. ते चारही पॉझिटीव्ह (Positive) असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र त्यातील तीन रुग्ण (patient) बरे होऊन घरी परतलेले असून, केवळ एका रुग्णावर इलाज सूरू असल्याचे वैद्यकिय अधिक्षक बापूसाहेब नागरगोजे (Medical Superintendent Bapusaheb Nagargoje) यांनी सांगितले. कोवीड (corona) पाठोपाठ आता श्वसनाला त्रास देणार्‍या एच3 एन2 (H3 N2) या आजाराचा प्रार्दूभाव वाढलेला आहे.

या आजारात तीन टप्पात रुग्णांवर इलाज केला जातो. प्राथमिक तपासणीतून घरी पाठवणे, रुग्णालयात दाखल करुन उपचार करणे व तिसरा व्हँटीलेटरच्या (Ventilator) आधाराने उपचार करणे होय. मात्र हा आजार घातक आजारात मोडत नसलातरी संसर्गजन्य असल्याने याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले.

एच3 एन2 या आजारात सर्दी, खोकला,ताप, अंगदूखी, डोकेदूखी, जुलाब, उलटी, यातील काही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराकडे दूर्लक्ष करु नये. प्रत्येकाने स्वच्छ व सूरक्षित रहावे असे आवाहन महानगर पालिकेच्या (Municipal Corporation) आरोग्य विभागातर्फे (Department of Health) नागरीकांना करण्यात आले आहे.

एच3एन2 या आजाराबाबत लोकांनी घाबरुन न जाता वैद्यकिय उपचार तातडीने घ्यावे. घरगुती इलाजात वेळ घालवू नये हा संसर्गजन्य आजार असल्याने घरात पसरु शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

- बापूसाहेब नागरगोजे वैद्यकिय अधिक्षक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com