खुशखबर! राज्यसेवा परीक्षेच्या 'इतक्या' जागा वाढल्या

खुशखबर! राज्यसेवा परीक्षेच्या 'इतक्या' जागा वाढल्या
एमपीएससी

पुणे | Pune

महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेअंतर्गत २९० पदांसाठी १६ संवर्गात भरती होणार होती. आता एमपीएससीकडून (MPSC) पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे...

आता एकूण १०० पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ३९० पदांसाठी दि. २ जानेवारी २०२२ ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. पदांच्या संख्येत वाढ झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आज एमपीएससीने नवीन परिपत्रक काढत एकूण २० संवर्गात ३९० पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. क्लास १ (गट अ च्या) 100 जागा वाढल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे..

ही जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दि. २ जानेवारी व मुख्य परीक्षा दि. ७, ८ व ९ मे २०२२ रोजी घेण्यात येईल.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि. २५ ऑक्टोबर आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ५४४ तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी ३४४ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

या पदांसाठी होणार परीक्षा

उपजजिल्हाधिकारी १२, पोलीस उपअधीक्षक १६, सहकार राज्य कर आयुक्त १६, गटविकास अधिकारी १५, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ १५, उद्योग उप संचालक ४, सहायक कामगार आयुक्त २२, उपशिक्षणाधिकारी २५, कक्ष अधिकारी ३९, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ४, सहायक गटविकास अधिकारी १७, सहायक निबंधक सहकारी संस्था १८, उपअधीक्षक भूमि अभिलेख १५ , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क १, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क १,सहकारी कामगार अधिकारी ५४, मुख्याधिकारी गट ब ७५, मुख्याधिकारी गट अ १५, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ १० या पदांसाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.