मुंबईत गोवरचे थैमान; सहा मुलं ऑक्सिजनवर, सात संशयितांचा मृत्यू

मुंबईत गोवरचे थैमान; सहा मुलं ऑक्सिजनवर, सात संशयितांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

मुंबईत गोवर साथीने थैमान घातल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत गोवरमुळे (Measles) 7 संशयितांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये एका वर्षाच्या मुलाचादेखील समावेश आहे....

मुंबईत जानेवारीपासून गोवरचे 142 रुग्ण आढळले आहेत. तर सद्यस्थितीत 61 सक्रिय रुग्ण आहेत. गोवरने एका वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corportion) कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) मोहम्मद हसन नावाच्या बाळाचा गोवरमुळे मृत्यू झाला.

मुंबईत गोवरचे थैमान; सहा मुलं ऑक्सिजनवर, सात संशयितांचा मृत्यू
ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

मुंबईत तब्बल 908 मुले गोवरचे संशयित रूग्ण आहेत. ताप आणि पुरळ अशी गोवरची लक्षणे आहेत. सध्या 61 गोवरग्रस्त रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 6 मुलांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com