Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याअधिक मासात सोन्याला झळाळी

अधिक मासात सोन्याला झळाळी

नाशिक । Nashik

अधिक मासामुळे सराफा बाजारात सोने चांदीच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी वाढत आहे.

- Advertisement -

करोना परिस्थिती, पितृपक्षामध्ये ठप्प झालेल्या सराफ बाजारात पुन्हा चैतन्य पहायला मिळत आहे. तीन वर्षातून एकदा येणार्‍या अधिक मासात जावयाला सोन्या-चांदीच्या विविध वस्तु देण्याची प्रथा असल्याने खरेदी वाढ होत आहे.

हिंदू धर्मात श्रावणमासा इतकेच तीन वर्षांनी येणार्‍या अधिक मसाला धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण असे महत्व आहे.

या महिन्यात लेक-जावयाला वाण देण्याची पुर्वीपासुनची प्रथा आहे. जोडवे, चांदीच्या वस्तूंमध्ये भर टाकण्याकडे गृहीणींचा कल असतो. जावयाला चांदीचे ताट, वाटी, ग्लाससह सोन्याची चेन, अंगठी अशा वस्तू देखील आपल्या अर्थिक परिस्थितीनुसार अनेक जण देतात. परिणामी सराफाबाजारात गर्दीत वाढ होत आहे.

चांदीच्या जोडव्यांमध्ये कुंदनकाम, ऑक्साइड पॉलिश, गंगा जमुना, मीनाकाम केलेले विविधरंगी आभुषणांना ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहेत. जावयांना देण्यासाठी शुध्द चांदीत तयार केलेल्या विविध घाटाच्या भेटवस्तू तसेच विविध प्रकारचे दिवे देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात १ ते ५०० ग्रॅम पर्यंतचे दागिन्यांचा देखील समावेश आहे.

चांदीत घसरण

सोन्याचा भाव गत महिन्यात 58 हजार रुपये प्रति तोळा तर चांदीही प्रति किलो ७७ हजारापर्यंत गेली होती. मागील पाच दिवसांमध्ये सोन्यात वाढ झाली असून ते ५२ हजार ६०० रुपये तर चांदीत घसरण झाली असुन ६० हजार ८०० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहेत.

सराफी व्यावसायिकांकडुन करोनाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षित अंतरासह सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहेत. ग्राहकांना देखील मास्क शिवाय दुकानात प्रवेश दिला जात नाही. अधिक मासात वाणाच्या वस्तुंना मोठी मागणी आहे.

-चेतन राजापूरकर, अध्यक्ष, नाशिक सराफ संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या