Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याराज्य सेवकांच्या महागाई भत्त्यात वाढ

राज्य सेवकांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्य शासकीय कर्मचार्‍यांसाठी(State Government Employees) केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

- Advertisement -

ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 31 वरुन 34 टक्के होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शासकीय कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ होणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर अनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस या पोर्टलच्या माध्यमातून करावी असे मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेअंती त्यांनी यासंदर्भात निर्देश दिले. गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या