Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशपीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीचे इगतपुरीत घबाड; 'इतक्या' एकर जमिनीवर 'आयटी'ची टाच

पीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीचे इगतपुरीत घबाड; ‘इतक्या’ एकर जमिनीवर ‘आयटी’ची टाच

नाशिक | Nashik

पीएनबी (PNB) घोटाळ्याप्रकरणी ईडीने मेहुल चोकसी आणि त्याच्या समुहाच्या एकूण 1 हजार 217 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्यानंतर आल्यावर आयटी विभागाने आता त्याची इगतपुरीतील मुंढेगावात असलेल्या बळवंतनगरमधील 9 एकर 28 गुंठे बेनामी जमीन जप्त केली आहे….

- Advertisement -

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) घोटाळ्याप्रकरणी अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीने गीतांजली जेम्स समुहाच्या (Gitanjali James group) मेहुल चोकसीची संपत्ती जप्त केली असून चोकसी यांच्या विरोधात रेड काॅर्नर नाेटीसही (red corner notice) जारी केली आहे.

चाेकसी याचे मुंबईमधले फ्लॅट्स, कोलकात्यामधला मॉल आणि हैदराबादमधील ज्वेलरी पार्क आयटी हे इडीच्या ताब्यात असून त्यात मुंबईत 15 फ्लॅट, 17 ऑफिसचा समावेश आहे.

तसेच आंध्रप्रदेश, हैदराबादमध्ये जेम्स एसईजी, कोलकातामधील शाॅपिंग माॅल, अलिबागमधील फार्म हाऊस आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये 231 एकर जमिनीवर टाच आणली आहे. आता आयटीने प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्जैक्शन अॅक्ट अंतर्गत बेनामीदार मेसर्स नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसइझेड लिमिटेड आणि बेनिफिशियल ओनर मेसर्स गीतांजली जेम्स लि. ची मालमत्ता जप्त केली आहे.

बळवंतनंगर मुंढेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक, (Balwant nagar mundhegaon District Nashik) येथील जमीन पूर्णपणे केंद्र सरकारच्या सर्व भारमुक्त निहीत असतील आणि अशा जप्तीच्या संदर्भात कोणतीही भरपाई देय असणार नाही असे आयटीने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या