आयकर विभागाची मोठी कारवाई; 'इतक्या' कोटींचे घबाड जप्त

आयकर विभागाची मोठी कारवाई; 'इतक्या' कोटींचे घबाड जप्त

मुंबई | Mumbai

जालन्यात (Jalna) आयकर विभागाने (Income Tax Department) स्टील कारखानदार (steel manufacturers) कपडे व्यापारी (clothing merchant) आणि रिअल इस्टेट डेव्हलपर (Real estate developer) यांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यात (Raid) तब्बल ३९० कोटींचे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे...

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाकडून घरं, कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यातून सापडलेली ही बेहिशेबी मालमत्ता जप्त (unaccounted assets seized) करण्यात आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम (cash) तसेच ३२ किलो सोन्याचे दागिने (Gold ornaments) हिरे (Diamonds) असा ऐवज आहे. याशिवाय ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. १ ते ८ ऑगस्टदरम्यान ही कारवाई सुरु होती. विशेष म्हणजे, रोख रक्कम जप्त केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तब्बल १३ तास मोजणी सुरु होती. या कारवाईसाठी पाच पथकं तयार करण्यात आली होती.

दरम्यान, आयकर विभागाचे अधिकारी लग्न सोहळ्याचे स्टिकर लावलेल्या गाड्यांमधून (Cars) छापा टाकण्यासाठी आले होते. या गाड्यांवर राहुल आणि अंजली... दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर लावले होते. जवळपास २०० गाड्यांमधून ४८० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी (Officers and employees) छापा टाकला. सुरुवातीला जालन्यातील नागरिकांना यासंदर्भात काहीही समजले नाही. कुणाच्या तरी कार्यक्रमासाठी या गाड्या आल्या असाव्यात असे वाटत होते. त्यामुळे छाप्याची कुणाला शंका आली नाही. मात्र काही वेळात हे वऱ्हाडी नव्हे तर आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com