Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआयकरची जिल्ह्यात मोठी कारवाई; 'या' साखर कारखान्यावर छापा

आयकरची जिल्ह्यात मोठी कारवाई; ‘या’ साखर कारखान्यावर छापा

लोहोणेर | प्रतिनिधी | Lohoner

देवळा तालुक्यातील (Deola taluka) विठेवाडी (vithewadi) येथील गत काळाच्या व सध्या भाडेतत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या वसंतराव दादा पाटील साखर कारखान्यावर (Vasantrao Dada Patil Sugar Factory) आयकर विभागाने (Income Tax Department) छापा (Raid) टाकला आहे..

- Advertisement -

पंढरपूर (Pandharpur) येथील उद्योजक अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या डी व्ही पी ग्रुपच्या (DVP Group) वतीच्या माध्यमातून धाराशिव समूहाने सुमारे २५ वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेतला आहे.

देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील कारखान्यावर आज आयकर विभागाने सकाळच्या सुमारास अचानक छापा टाकला. तब्बल पाच ते सहा तासापासून वसाका कार्यस्थळावरील मुख्य कार्यालयात सविस्तर चौकशी सुरू आहे.

तसेच याबाबत मोठी गोपनीयता पाळण्यात आली आहे. याशिवाय कारखान्याच्या आवारात कडे – कोठ पोलीस बंदोबस्त (Police Arrangements) असून कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात आत येण्या जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

दरम्यान, सकाळी सहावाजेपासून आयकर विभागाचे पथक कारखान्याच्या मुख्य कार्यालयात ठाण मांडून आहे. तसेच या चौकशीनंतर काय निष्पन्न होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या