Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीला दुसरा धक्का : अजित पवारांशी संबंधित 1000 कोटींची संपत्ती जप्तीची नोटीस

राष्ट्रवादीला दुसरा धक्का : अजित पवारांशी संबंधित 1000 कोटींची संपत्ती जप्तीची नोटीस

मुंबई

गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादीला दोन जबरदस्त झटके बसले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh)यांना ईडीने (ed)अटक केली. त्यानंतर आज आयकर विभागाने (income tax)उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar)यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाकडून झाडाझडती करण्यात येत आहे. त्यानंतर आता आयकर विभागाने अजित पवारांच्या संबंधित मालमत्ता जप्तीची नोटीस काढली आहे.

कुठली संपती जप्त होणार

जरंडेश्वर शुगर फॅक्ट्री

बाजार मूल्य: सुमारे 600 कोटी

साऊथ दिल्लीमधीली फ्लॅट

बाजार मूल्य: सुमारे 20 कोटी

पार्थ पवार यांचं निर्मल ऑफिस

बाजार मूल्य: सुमारे 25 कोटी

निलय नावाने गोव्यात बनलेला रिसॉर्ट

बाजार मूल्य: सुमारे 250 कोटी

महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन

बाजार मूल्य: सुमारे 500 कोटी

- Advertisment -

ताज्या बातम्या