चिनी मोबाईल कंपन्यांवर आयकर विभागाचा छापा

jalgaon-digital
1 Min Read

चिनी मोबाईल (mobile) कंपनीच्या देशभरातील प्रमुख कार्यालयांवर आज आयकर विभागाकडून (income tax)छापेमारी करण्यात आली आहे. त्यात मुंबईसह (mumbai)नोएडा, गुरुग्राम, हैदराबाद, बंगरुळू या शहरात देखील छापा टाकण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Xiaomi, ओप्पो (oppo)सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. मंगळवारी नेपाळमध्ये देखील काही चिनी कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

भारतामध्ये तब्बल 2.5 लाख कोटी रुपयांची स्मार्टफोनची बाजारपेठ आहे. त्यातील सुमारे सत्तर टक्के हिस्सा हा चिनी मोबाईल कंपन्यांचा आहे. भारतामधील टीव्ही कंपन्यांचे मार्केट 30,000 कोटी रुपयांचे आहे. यातील जवळपास 45 टक्के हिस्सा हा चिनी कंपन्यांचा आहे.

नंदुरबार जिल्हयात आयकर विभागाचे धाडसत्र

नेपाळ आणि अमेरिकेतही कारवाई

नेपाळ आणि अमेरिकेमध्येही चिनी कंपन्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. विविध आर्थिक गुह्यांमध्ये दोषी आढळून आल्याने मंगळवारी नेपाळ सरकारने काही चिनी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केले आहे. ज्यामध्ये चीन सीएमसी इंजीनियरिंग कंपनी, नॉर्थवेस्ट सिव्हिल एव्हिएशन एअरपोर्ट कंस्ट्रक्शन ग्रुप आणि चायना हार्बल इंजीनियरिंग कंपनी यांचा समावेश आहे. तर गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेने देखील चिनच्या तब्बल 13 कंपन्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *