बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात 'पीसीव्ही' लसीचा समावेश

दरवर्षी १९ लाख बालकांना देणार लस
बालकांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात 'पीसीव्ही' लसीचा समावेश
USER

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण ( routine immunization program ) कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) ( Pneumococcal conjugate vaccine )या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून दरवर्षी सुमारे १९ लाख बालकांना ही लस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने ( Department of Health ) दिली आहे.

बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी इत्यादी लसी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जातात. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बालकांचे न्युमोनियापासून संरक्षण करण्यासाठी पीसीव्ही लस दिली जाणार आहे.

राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत आजपासून या लसीचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे( Health Minister Rajesh Tope )यांनी सोमवारी सांगितले.

अर्भक मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त : डॉ. प्रदीप व्यास ( Dr. Pradeep Vyas )

बालकांना पीसीव्ही लसीच्या तीन मात्रा दिल्या जाणार असून जन्मानंतर सहाव्या आठवड्यात चौदाव्या आठवड्यात आणि नवव्या महिन्यात दिली जाणार आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमात ही लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर अर्भकांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल, असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले. या लसी संदर्भात प्रशिक्षण आणि मार्गदर्शक सूचना जिल्ह्यांना देण्यात आले असून जाणीव जागृतीसाठी पोस्टर्स, बॅनर्स तयार करण्यात आल्याचे डॉ.व्यास यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांमध्ये ही लस सशुल्क उपलब्ध आहे. तर शासकीय आरोग्य संस्था, रुग्णालय तसेच लसीकरण सत्र आयोजित केलेल्या ठिकाणी सर्वांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्याचे अतिरिक्त संचालक डॉ.डी.एन.पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com