Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याओझर विमानतळाचा कृषी उडाण योजनेअंतर्गत समावेश

ओझर विमानतळाचा कृषी उडाण योजनेअंतर्गत समावेश

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali

संपूर्ण देशात नाशिकची (nashik) ओळख कृषीप्रधान जिल्हा (Agricultural district) म्हणून असून 70 टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीव्यवसायावर (Agriculture) चालतो.

- Advertisement -

येथील शेतीमाल कमीतकमी वेळेत विविध राज्यांसह परदेशात जावा यासाठी ओझर विमानतळाचा (Ozar Airport) कृषी उडान योजनेत (krushi udan yojna) समावेश करून जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असून केंद्र सरकार (central government) याबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया (Union Minister Jyotiraditya Scindia) यांनी खा. गोडसे (mp hemant godse) यांना दिली आहे.

जिल्ह्यातील शेतीमाल परराज्यात जावा यासाठी दिड वर्षापूर्वी खा. गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे देवळाली कॅम्प (deolali camp) येथून देशातील पहिली किसान रेल (Kisan Rail) सुरू करण्यात आली. सुरूवातीला आठवड्यातून दोनवेळा असलेली रेल्वे आता शेतकर्‍यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता तीन दिवस धावू लागली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीमाल उत्पादित होत असून यात कांदा (onion), भाजीपाला (vegetables) तसेच फळांचा समावेश आहे.

मात्र यातील काही शेतीमाल नाशवंत असल्याने शेतीमालाचा समावेश असल्याने तो तातडीने विक्रीसाठी विविध राज्यांसह परदेशात पोहचविता यावा, यासाठी खा. गोडसे यांनी किसान रेल पाठोपाठ हवाई सेवेच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न सुरू केले होते. या प्रयत्नांना आता यश मिळणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

खा.गोडसे यांनी केंद्रीय उडान मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया व उडाण मंत्रालयाच्या उपसचिव उषा पाधी यांची भेट घेत नाशिक जिल्ह्यात (nashik distrct) मोठ्या प्रमाणात उत्पादित होणार्‍या शेतमालाबाबत प्रश्न उपस्थित केला. परराज्यात आणि परदेशात विक्री व्यवस्थेसाठी वाहतुक व्यवस्था (Transportation arrangements) जलद गतीने तसेच वेळेत उपलब्ध असल्यास नुकसान टळेल.

शेतकर्‍यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळून शेतकर्‍यांची आर्थिक भरभराट होण्यास मदत होईल, आदी मुद्दे गोडसे यांनी मंत्री सिंदिया, अधिकारी उषा पाधी यांच्यासह मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले. याबाबत शेतकर्‍यांविषयीची तळमळ आणि शेतीमालाच्या वाहतुकीसाठी हवाई सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी न्यायिक असून यासाठी लवकरच ओझर विमानतळाचा कृषी उडाण योजनेअंतर्गत समावेश करण्यात येणार असल्याची ग्वाही उडाण मंत्रालयाने खा. गोडसे यांना दिली आहे.

ओझर विमानतळाचा समावेश कृषी उडाण योजनेत झाल्यास जिल्हयासह उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळणार असून शेतीमाल सुरक्षित आणि अत्यंत कमीतकमी वेळेत विविध राज्यांसह परदेशात पोहचविणे शक्य होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. या सुविधेसाठी शेतकर्‍यांना वाहतुकीच्या भाड्यावर शासनाकडून विशेष अनुदानही मिळणार असल्याचे खा. गोडसे यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या