'रिव्हर सिटीज अलायन्स'मध्ये नाशिकचा समावेश

गोदावरीचे 2027 पर्यंत पुनरुज्जीवन करण्याचा माझा निर्धार: केंद्रीय मंत्री शेखावत
'रिव्हर सिटीज अलायन्स'मध्ये नाशिकचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी (Management of urban rivers) धोरणे ठरविणार्‍या रिव्हर सिटीज अलायन्स (River Cities Alliance) (आरसीए) मध्ये नाशिकचा (nashik) समावेश केल्याची घोषणा केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत (Union Water Power Minister Gajendra Singh Shekhawat) यांनी केली.

शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी धारा 2023 ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बैठकीत शेखावत उपस्थित होते. गोदावरीचे (godavari) 2027 पर्यंत पूनरुज्जिवन करण्याचा निधार्र्र यावेळी करण्यात आला. देशातील 30 शहरांच्या मध्यभागातून जाणार्‍या शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी 25 नोव्हेंबर 2021 ला रिव्हर सिटीज अलायन्सची (River Cities Alliance) सुरुवात झाली.

गेल्यावर्षी ही सदस्य संख्या 95 पर्यंत पोहचली आणि आता 107 शहरे आरसीएचे (RCA) सदस्य झाले आहेत. शहरी नद्यांच्या व्यवस्थापनासाठी धोरणे ठरविणार्‍या ’धारा 2023’ या दोन दिवसाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी देशातील नवीन 12 शहरे ’रिव्हर सिटीज अलायन्स’चे (आरसीए) सदस्य झाले आहेत. नव्या शहरांमध्ये राज्यातील नाशिक आणि नांदेड-वाघाळा या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

या परिषदेला सदस्य शहरांचे आयुक्त, कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी शहरी नद्यांच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा आणि चांगल्या कार्यपद्धतींचे सह-शिक्षण होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा आरसीएचा उद्देश आहे. जल संबंधित क्षेत्रांमध्ये भारत सध्या 240 अब्ज गुंतवणूक करत आहे. नदी जोडणी, भूजल पुनर्भरण (Groundwater Recharge), भूजलाचे नकाशीकरण अशा बाबींचा यामध्ये समावेश आहे. सर्व राज्यांसाठी वॉटरव्हिजन 2047 (Watervision 2047) हे ध्येय असून, जल सुरक्षा आणि व्यवस्थापन हे आर्थिक विकासाला सुसंगत राहणार असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री शेखावत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Commissioner of Nashik Municipal Corporation Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी गोदावरी प्रदुषण मुक्त (pollution free godavari) करण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची माहीती दिली. गोदावरीला मिळणार्‍या सर्व 19 नाल्यांमधून येणारे दूषित पाणी (Contaminated water) थांबवून त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. या कामी नीरी तसेच आयआयटी पवई यांची मदत घेण्यात येत आहे.

साधारणत: तीन महिन्यांमध्ये हा अहवाल पूर्ण होईल. त्यानंतर जलशक्ती मंत्रालयाकडे सादर करण्यात येईल. नमामी गोदावरी अंतर्गत प्रस्तावित करण्यात येणारी सर्व कामे आगामी 2027 च्या सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त डॉ. पूलकूंडवार यांनी स्पष्ट केले. धारा 2023 च्या पहिल्या दिवशी अयोध्या आणि औरंगाबाद या दोन शहरांतील नद्यांच्या व्यवस्थापन योजनांचे अनावरण संबंधित शहरांच्या प्रतिनिधीसोबत ना. शेखावत यांच्या हस्ते करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com