Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'सारथी'तून सरकारी योजना कृतीत आणाव्यात : एकनाथ शिंदे

‘सारथी’तून सरकारी योजना कृतीत आणाव्यात : एकनाथ शिंदे

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

पुण्यानंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या नाशिक विभागीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे हस्ते पार पडले…

- Advertisement -

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी साकारलेल्या सारथी कार्यालयाचे पुण्यानंतर नाशिकमध्ये विभागीय कार्यालय होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

मराठा कुणबी व कुणबी मराठा समाजातील गरीब गरजू तरुणाला प्रशिक्षण देण्यासाठी सारथीने सरकारी योजना कागदावरनं ठेवता कृतीत आणाव्यात सरकार त्यास पूर्णपणे पाठबळ देऊ, हात आखडता घेतला जाणार नाही असे शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.

तीन महिन्यापूर्वी आम्ही जो धाडसी निर्णय घेतला त्या निर्णयाचा राज्यातील, देशातील जनतेने समर्थन दिले. जगात या निर्णयाची नोंद झाली आणि त्या जोरावर आम्ही राज्यामध्ये सरकार स्थापन केले. त्यामुळे आम्ही स्थापन केलेल्या सरकार हे सर्व सामान्य सर्वसमावेशक जनतेचा असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजातील सामाजिक मागास सिद्ध करण्याबाबत कारणे दिल्याने ते सिद्ध करण्यासाठी राज्य सरकार वकिलांची मोठी फौज न्यायालयासमोर उभारून मराठा समाजाची बाजू मांडणार आहे.

कुठल्याही परिस्थितीत न्यायालयासमोर सरकार मराठा समाजाची बाजू पडू देणार नाही आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

याप्रसंगी सारथी या कार्यालयाच्या कोणशिलाचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे आदींनी कार्यालयाची पाहणी करून उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक सारथीचे प्रभारी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी केले. व्यासपीठावर विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, दिलीप बनकर, किशोर दराडे, नरेंद्र दराडे, जिल्हाधिकारी गंगाथरण डी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक नितीन गावंडे, महापालिकेचे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे आदी उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील व वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या