
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीला कमी वेळेत जोडणार्या तसेच राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे (Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Samriddhi Highway) आज, रविवारी 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.
नागपूर ( Nagpur ) दौर्यावर येत असलेले मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत.पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार्या लोकार्पण सोहळ्यातील विविध कार्यक्रमांमध्ये खापरी मेट्रो स्टेशन, नागपूर फेज 1 चे उद्घाटन, वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणे, मिहान एम्सचे लोकार्पण त्यानंतर वायफळ टोल नाका येथून समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. झीरो माईल्स ते वायफळ टोलनाका असा प्रवास देखील करणार आहेत. टेम्पल मैदानावर पंतप्रधानांची सभा होणार आहे.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, हरदीप पुरी, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आदी उपस्थित राहणार आहेत.