Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या'महामनी कॉनक्लेव-23' परिषदेचा शुभारंभ

‘महामनी कॉनक्लेव-23’ परिषदेचा शुभारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आयएमए महाराष्ट्रच्या वतीने आयएमए नाशिकने राज्यस्तरीय वित्त व्यवस्थापन संबंधित अनेक विषयांवर राज्यभरातल्या डॉक्टरांसाठी दोन दिवसांच्या ‘महामनी कॉनक्लेव-23’ या परिषदेचे आयोजन केले आहे. काल महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, खजिनदार डॉ. राजीव अगरवाल आणि नाशिकचे सिव्हील सर्जन डॉ. अशोक थोरात ह्यांच्या उपस्थितीत महामनी कॉनक्लेव 23 चा शुभारंभ करण्यात आला.

- Advertisement -

परिषदेच्या पहिल्या दिवशी डॉक्टर आणि उद्योजकता, वेगवेगळ्या सरकारी वित्त व्यवस्थापन योजना, मनी इज स्पिरीचुअल, डॉक्टर्स आणि विविध टॅक्सेस, कमोडिटी बाजार आदी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. राज्यासह देशभरातून 1800 डॉक्टरांनी ह्या परिषदेत सहभाग घेतला आहे. यात काही विदेशी प्रतिनिधी उपस्थित होते.

‘फायनान्सिअल लिटरसी फॉर डॉक्टर्स बेसिक व अ‍ॅडव्हान्स’अशा संकल्पनेवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णसेवेसाठी सतत परिश्रम करताना डॉक्टर्स स्वत:चा आर्थिक विकास आणि गुंतवणूक करताना कुठेतरी कमी पडत राहतात. डॉक्टरांना ना कोणत्या सुविधा असतात ना सुट्ट्या ना पेंशन. त्यामुळे डॉक्टरांना वित्त व्यवस्थापन साक्षर करण्याचा विचार विचार केला. समाजासाठी झटताना डॉक्टरांनी स्वतःच्या आर्थिक समर्थतेचाही विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिक आयएमएचे अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

स्टेट आयएमएचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे यांनी देशातली डॉक्टरांसाठी अशी पहिलीच वित्त व्यवस्थापन साक्षरतेवर परिषद आयोजित केल्याबद्दल नाशिक आयएमएचे कौतुक केलें. खर्‍या गुणांची पारख असलेली व्यक्तीच यश आणि समृद्धी मिळवू शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले. डॉ. अशोक थोरात यांनी सर्व डॉक्टरांनी उत्तम वित्त व्यवस्थापन शिकून घ्यावे, असे सांगितले. दोन दिवस चालणार्‍या ह्या वित्त व्यवस्थापन साक्षरता परिषदेचा आढावा आणि आभार आयएमए नाशिकच्या सचिव डॉ. माधवी गोरे- मुठाळ यांनी केले.

नियोजन व यशस्वितेसाठी डॉ. पंकज भट, डॉ. सागर भालेराव, डॉ. नीलेश जेजूरकर, डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. भूषण नेमाडे, डॉ. मनीषा जगताप, डॉ. मिलिंद भराडीया, डॉ. अनुप भारती, डॉ. मृगाक्षी क्षीरसागर, डॉ. निकिता पाटील, डॉ. विशाल पवार, डॉ. शलाका बागुल यांसह अध्यक्ष डॉ. विशाल गुंजाळ आणि सचिव डॉ. माधवी गोरे- मुठाळ आदींसह पदाधिकारी प्रयत्नशील होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या