
नाशिक | प्रतिनिधी Nashik
राज्यातील विविध पवित्र जैन तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा व सुविधांसाठी पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे ( Jain Pilgrimage Circuit )लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुमुक्षरत्न सेतुकभाई अनिलभाई शाह यांच्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्यातील 9 तीर्थस्थानांचे या सर्किटमध्ये समावेश करण्यात आला असून त्यात नाशिक जिल्हातील दोन तिर्थस्थानांचा समावेश आहे. राजभवन हा कार्यक्रम संपन्न झाला. या सर्किटमध्ये जिल्ह्यातील तीर्थस्थानापैकी सटाणा (जि. नाशिक) येथील श्री मांगी तुंगीजी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र देवस्थान व वणी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वाभ्युदय तीर्थ यांचा समावेश करण्यात आला आहे.
यासोबतच राज्यातील शहापूर (जि. ठाणे) येथील मानसमंदिर (शाहपूर जैन तीर्थ), साक्री (जि. धुळे) येथील श्री बलसाना श्वेतांबर जैन तीर्थ, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील श्री जगवल्लभ पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील कुम्भोज बाहुबली जैन मंदिर, पाबळ (ता. शिरुर, जि. पुणे) येथील पद्म आणि जैन तीर्थ, पायधुनी (मुंबई) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ तीर्थ, शिरपूर (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या तीर्थस्थळांंच्या यादीत नाशिकच्या दोन तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आल्याबद्दल आनंद आहे यामुळे देशभरातील जैन बांधव या स्थळाला भेट देतील त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. या जैन सर्किटमध्ये नाशिकच्या गजपंंथ चामरलेणीचा देखिल समावेश होणे आपेक्षित होते.तेही पूरातन व जैन समाजासाठी महत्वाचे आहे. शासनाने त्याचाही समावेश करावा
पारस लोहाडे राष्ट्रीय अध्यक्ष,जैन ग्लोबल युथ फोरम