Video : ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’चा शानदार शुभारंभ

पहिल्याच दिवशी नागरिकांचा उदंड प्रतिसाद
Video : ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो’चा शानदार शुभारंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपुर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सुत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत प्रॉपर्टी एक्स्पो 2022’ (Deshdoot Property Expo 2022) प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला...

नाशिकरोड (Nashikroad) येथील महापालिका मैदान, बिटको चौक, जेलरोड येथे दि. 7 ते 9 जानेवारी या तीन दिवसांत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि तत्सम असे एकूण 30 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

एचडीएफसीचे उत्तर महाराष्ट्र बिझनेस हेड संदीप कुलकर्णी (Sandip Kulkarni) व क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन (Ravi Mahajan) यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन (Inauguration) करण्यात आले. प्रारंभी देशदूतचे मार्केटिंग महाव्यवस्थापक अमोल घावरे (Amol Ghaware) यांनी प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी कुलकर्णी व महाजन यांनी सदर एक्स्पोच्या आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणार्‍या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले.

प्रदर्शनाचे प्रायोजकत्व एचडीएफसी हाऊसिंग यांनी स्विकारले आहे. हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत सर्वांसाठी खुले असून तीन दिवस शासनाच्या कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जाणार आहे.

गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काल पहिल्याच दिवशी नागरिकांनी भेट देऊन या प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय लोळगे तर आभार अमोल घावरे यांनी मानले.

Related Stories

No stories found.