Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पोचा शानदार शुभारंभ

Video : देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पोचा शानदार शुभारंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उत्तम दर्जा, सुयोग्य स्थान, भरपूर सुविधा आणि वाजवी मूल्य या चतु:सूत्रीचा संगम साधलेल्या गृहप्रकल्पांचा अंतर्भाव असलेल्या ‘देशदूत’ (Deshdoot) आयोजित तसेच ललित रुंगटा ग्रुप (Lalit Roongta Group) प्रायोजित इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो २०२२ (Indiranagar Property Expo) प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांची मोठी गर्दी झाली….

- Advertisement -

दि. २९ व ३० एप्रिल आणि १ मे २०२२ या तीन दिवसांत प्रदर्शनाचे आयोजन इंदिरानगर येथील अजय मित्रमंडळ पटांगणावर, रथचक्र हौसिंग सोसायटीजवळ, एचडीएफसी बँकेमागे करण्यात आले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिक आणि तत्सम असे २२ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

माजी महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांच्या हस्ते व ललित रुंगटा ग्रुपचे डायरेक्टर अभिषेक बुवा, माजी नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी आणि माजी नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रॉपर्टी एक्सपोचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रारंभी ‘देशदूत’चे मार्केटिंग महाव्यवस्थापक अमोल घावरे (Amol Ghavare) यांनी प्रमुख अतिथींचे रोपटे देऊन स्वागत केले.

सतीश कुलकर्णी यांनी प्रदर्शन आयोजनाबाबत सामान्य नागरिक व बांधकाम व्यावसायिक यांच्यात विश्वासार्हतेचा सेतू निर्माण करणाऱ्या ‘देशदूत’ परिवाराचे कौतुक केले. प्रदर्शनाचे प्रायोजकत्व नाशिकमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी स्वीकारले आहे.

प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. गृहस्वप्नपूर्तीसाठी नागरिकांनी भेट द्यावी, देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी दै देशदूतचे जाहिरात व्यवस्थापक मिलिंद वैद्य, वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक, जाहिरात व्यवस्थापक (ग्रामीण) सचिन कापडणी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, आनंद कदम, समीर पाराशरे, रितेश जाधव, विशाल जमदाडे यांनी परिश्रम घेतले. मुख्य बातमीदार रवींद्र केडीया यांनी आभार मानले.

सुवर्ण त्रिकोण असलेल्या मुंबई पुणे नंतर नाशिक या महत्वाच्या शहराची झपाट्याने वाढ होत असून देशदूत ने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे अनेक जणांना हक्काचे घर घेण्यास मदत होणार आहे.

सतीश कुलकर्णी

अनेक बांधकाम व्यावसायिकांना व्यासपीठ मिळाले असून इंदिरा नगर आणि परिसरातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. देशदूतच्या माध्यमातून होणारा हा उपक्रम प्रशंसनीय असा आहे.

सतीश सोनवणे

ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये योग्य समन्वय साधला जाणार आहे. देशदूत ने आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यायला हवा.

डॉ. दीपाली कुलकर्णी

हक्काचे घर घेण्याची मोठी संधी इच्छुकांना चालून आली आहे. करोना काळानंतर मोजकेच प्रॉपर्टी एक्स्पो शहरात आयोजित झाले असून देशदूतने आयोजित केलेल्या या एक्सपोत एकाच छताखाली अनेक पर्याय उपलब्ध झाले असून त्याचा नक्क्की नागरिकांनी लाभ घ्यावा.

अभिषेक बुवा

- Advertisment -

ताज्या बातम्या