Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासाहित्य संमेलन : मराठीला अभिजात भाषेचा दर्जासाठी लाखो पत्र राष्ट्रपतींना पाठवणार

साहित्य संमेलन : मराठीला अभिजात भाषेचा दर्जासाठी लाखो पत्र राष्ट्रपतींना पाठवणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आजपासून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी विशेष अतिथी म्हणून सदानंद मोरे, डॉ. राजा दीक्षित, प्राध्यापक रंगनाथ पठारे, प्राध्यापक हरी नरके, कौटिकराव ठाले-पाटील, हेमंत टकले, पंकज भुजबळ उपस्थित होते.

अभिजात मराठी दालनामार्फत लाखो पत्र राष्ट्रपतींना पाठवण्यात येणार आहे. त्यात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. संमेलनाला आलेले अनेक जण या दालनाला भेट देत असून पत्रवर सह्या करत आहेत.

संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर यांची संमेलनाला ऑनलाईन उपस्थिती

उद्घाटनप्रसंगी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, अभिजात भाषा प्रकरण काय आहे? हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आमचा प्रयत्न आहे. देशातल्या सहा भाषांना अभिजात भाषांना दर्जा मिळाला आहे. केंद्राकडे मराठी भाषा अभिजात भाषेचा मुद्दा प्रलंबित आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रपतींना पत्राद्वारे विनंती करून अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पत्र पाठवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याबाबत लवकरच पत्र राष्ट्रपतींना जातील. आता हा प्रश्न जनतेच्या दरबारात आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. राजमान्यता जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. परंतु लोकमान्यता दिली पाहिजे.

काय आहे अभिजात भाषा

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर राज्याला भाषेचा विकासासाठी भरीव अनुदान मिळते. केंद्र सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता.

Video कौन बनेगा करोडपती : अमिताभच्या डोळ्यात यामुळे आले आश्रू…

पत्रकारांशी बोलतांना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई म्हणाले, मराठी भाषा अभिजात असल्याचा अहवाल केंद्राच्या भाषा समितीला देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची याबाबत भेट घेतली आहे. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही एक चळवळ होणे आवश्यक आहे. त्यासाठी १२ कोटी मराठी जनतेने राष्ट्रपतींना पत्र पाठवावे.

- Advertisment -

ताज्या बातम्या